मी श्री उज्वल मोरेश्वर पाटील, चिंचणी पाटीलवाडा यांनी आपली आई कै. शांती मोरेश्वर पाटील यांच्या नावाने “शांती फौउंडेशन” नावाची संस्था स्थापन केली असून संस्था नोंदणीकृत केली आहे.
चिंचणी पाटीलवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ५ येथे दिनांक १३/०७/१६ रोजी गरीब व गरजू मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला .
जिल्हा परिषद शाळा केंद्र बाडापोखण येथे दिनांक १९/०१/२०१७ रोजी झालेल्या बालकमेळाव्यात शाळेतील मुलाना जेवणाची सोय केली. सदर कार्यक्रमात साधारण पणे दोन हजार मुले उपस्थित होती.
दिनांक २१/०९/१६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चिंचणी गावातील अनेक कुटुंबे अडचणीत आली . त्यातीलच काही कुटूंबियाना ह्या दिवाळीचे औचित्य साधून धान्य व दिवाळी फराळ वाटून आपली सामाजिक जबाबदारी पाळली .
डहाणू येथील कर्ण बधीर शाळेतील मुलांना स्वछ व फिल्टर केलेले पाणी पिण्यास मिळावे म्हणून शाळेला ताशी 30 लिटर capacity चा water filter व मे महीन्यात पाण्याची तुट निर्माण होवु नये म्हणून 500 लिटरची पाण्याची टाकी भेट दिली.