ABOUT


मी श्री उज्वल मोरेश्वर पाटील, चिंचणी पाटीलवाडा यांनी आपली आई कै. शांती मोरेश्वर पाटील यांच्या नावाने “शांती फौउंडेशन” नावाची संस्था स्थापन केली असून संस्था नोंदणीकृत केली आहे. संस्थे मार्फत खालील उपक्रम राबवले जातात.
१. शालेय विद्यार्थ्यांना शैषणिक सुविधा उपलब्ध करून देणे. उदा. शालेय वस्तू, शुद्ध पाण्याचे उपकरणं बसविणे.
२. बालवाडी, अंगणवाडी च्या लहान मुलांना खेळाचे साहित्य पुरवणे.
३. सामाजिक सेवा म्हणून दुर्बल घटकातील लोकांना धान्य वाटप करणे.
४. आरोग्य सेवा म्हणून रुग्णांना गरज असल्यास घरी water-bed, व्हील चेयर, बेड, इत्यादी साहित्य विनामूल्य रुग्ण बरा होई पर्यंत वापरण्यास देणे.
५. रक्तदान शिबीर आयोजित करणे.
६. मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
७. मुलगी वाचवा अभियान राबिविणे.
८. वृद्धाश्रमा साठी आर्थिक मदत करणे.
९. अनाथ मुलांना शैषणिक मदत करणे.
१०. पर्यावरण रक्षण अभियान राबवीणे.